Maharashtra MP Navneet Rana Receives Death Threat Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra MP Navneet Rana Receives Death Threat: खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी! पाकिस्तान व अफगाणिस्तान कनेक्शन आलं समोर

Maharashtra MP Navneet Rana Receives Death Threat: खासदार नवनीत राणा यांना व्हॉट्सअॅपवर क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. याबाबत नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra MP Navneet Rana Receives Death Threat: गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आमदार, खासदार, मंत्र्याना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. नवनीत राणा यांना 3 मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम 354 A,354 D,506 (2),67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही खासदार नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा यांना एका परदेशी नंबरवरुन धमकी देणारी व्हॉट्सअॅपला एक ऑडिओ क्लीप आली होती. या क्लीपमध्ये नवनीत राणा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जवळपास तीन मिनिटांची ही ऑडिओ क्लीप आहे.

दुपारी 2 वाजून 9 मिनिटांनी ही ऑडिओ क्लीप नवनीत राणा यांना आली होती. त्यानंतर 2 वाजून 13 मिनिटाने याच नंबरवरुन व्हॉट्सअप व्हाईस कॉल आला, जो नवनीत राणा यांनी उचलला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी आणखी एक ऑडिओ क्लीप आली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं देखील नाव या ऑडिओ क्लीपमध्ये घेण्यात आलं आहे. अफगाणिस्तानने अमेरिकेची जशी वाट लावली तशीच भारताचीही आम्ही वाट लावू शकतो. आम्ही ठरवलं तर क्षणात काहीही करु शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT