Nanded
Nanded esakal
महाराष्ट्र

Nanded: शिंदे सरकारची डोकेदुखी वाढली! नांदेडमधील 25 गावंही म्हणतात महाराष्ट्रात नाही रहायचं

रुपेश नामदास

Nanded: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंय. पाणी प्रश्नावरुन जत तालुक्यातल्या काही गावांमध्ये कर्नाटकचे झेंडे फडकले. अशातच सोलापूरमधील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही जिल्ह्यांवर दावा सांगितला आहे.  (Maharashtra Karnataka Border issue Eknath Shinde Solapur 28 villages merge with Karnataka)

हेही वाचा- आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

बोम्मई यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. राज्यातील एकही गावच काय जमिनीचा तुकडाही कर्नाटकाला जाऊ नये म्हणून राज्यसरकार जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान आता हा वाद चालू असतानात पुन्हा महाराष्ट्रात आणि तेलंगणा हा वाद चालू होण्याची चिन्हे आहेत.

कारण नांदेड जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील 25 गावांनीही आता तेलंगणा राज्यात जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. अनेक वर्षांपासून या गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील लोक त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व गावांचे सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते यांची बासर येथे एक बैठक झाली.

या बैठकीमध्ये त्यांनी तेलंगणामध्ये सामील होण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. गावचा विकास नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, वाढता भ्रष्टाचार, रस्त्याची दुरवस्था, कामाच्या संधी या सगळ्यांचा गोष्टींचा त्रास या गावातील लोक सहन करत आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. मात्र यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT