Avinash Jadhav sakal
महाराष्ट्र बातम्या

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात तक्रार दाखल

रुपेश नामदास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारी क्लिप व्हायरल होत असल्याचे मनसेने कार्यकर्त्यांनी म्हटंल आहे या आधारे तक्रार दाखल केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मशीद, मजार उभारणीकडे व्हिडीओच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होते. त्यानंतर तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करत माहिम आणि सांगलीतील अनधिकृत मजारवर कारवाई करून उध्वस्त केले.

त्यानंतर अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्या असल्याचं उघडकीस आणलं होत. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने संबंधित ठिकाणची पाहणी केली होती. त्यानंतर अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक म्हणत आहेत की,

अविनाश जाधव यांना, " हम उसे जिंदा नही छोडेंगे, कोई गुस्ताख छुप न पाएगा, हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे ... " बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही, असे मनसेने म्हटले आहे.

याआगोदर देखीन मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता. शिवाजी पार्क परिसरात फिरण्यासाठी गेले असता सकाळच्या सुमारास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला झाला होता. यामध्ये त्यांचा हात मोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT