Eknath Shinde, devendra Fadanvis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : विरोधकांना मिळालं आयतं कोलीत; राज्य सरकारच्या GR मध्ये मोठी चूक

या चुकीमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Big Mistake In Maharashtra Government GR : राज्य सरकारकडून काल जारी करण्यात आलेल्या GR मुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या GR मध्ये ही चूक झाली आहे. या चुकीमुळे विरोधकांना राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी आयतं कोलित मिळालं आहे. या चुकीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे.

त्याचे झाले असे की, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची फेररचना करण्यासाठी राज्य सरकारकडून काल एक जीआर जारी करण्यात आला आहे.

पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या या जीआरची सुरूवातीला हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, अशी सुरूवात करण्यात आली आहे. याच एका वाक्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कारण अद्यापपर्यंत भारत सरकारकडून कोणत्याही एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. भारतात अनेकजणांचा हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा समज आङे, मात्र, ही राष्ट्रभाषा आहे याबाबत कोणतेही अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही.

GR मध्ये नेमकं काय?

पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या जीआरमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी आणि उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे.

उपर्निर्दिष्ट क्र. 1 च्या शासन निर्णयान्वये नियुक्त केलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष/अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या उपर्निर्दिष्ट क्र. 2 च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आल्या आहेत. सदर सहमतीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, अशी प्रस्तावना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT