farmer 350 km journey from the bicycle for a piece of land
farmer 350 km journey from the bicycle for a piece of land 
महाराष्ट्र

जमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास

प्रशांत बारसिंग

मुंबई - मळकट सदरा-पायजमा आणि गांधी टोपी अशा वेशात प्लास्टिकच्या पिशवीत कागदाचे भेंडोळे घेऊन सांगलीच्या शेतमजुराने न्यायासाठी तब्बल 350 किलोमीटर सायकलने प्रवास करून मंत्रालय गाठले. प्रवासासाठी तिकिटाचे पैसे नसल्याने ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत एक हजार रुपयासाठी गहाण पडलेली दीड एकर जमीन सोडवण्यासाठी आलेल्या या शेतमजुराचे पाय तीन दिवस आणि दोन रात्रींच्या प्रवासामुळे अक्षरश: सुजले होते. 

सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्‍यातील तांबवे गावातील नायकू बजरंग सुतार हा एक शेतमजूर. 20-25 वर्षांपूर्वी एकाने त्याच्या सासऱ्याची गावातील दीड एकर जमीन अवघ्या एक हजार रुपयात गहाण घेतली होती. कालांतराने त्याने ती जमीन स्वतःच्या नावावरही करून घेतली. नायकूच्या सासऱ्याला मुलगा नसल्याने तो सासूरवाडीतच राहतो; परंतु हक्‍काची जमीन नसल्याने त्याला शेतमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. जमिनीचा हा हक्काचा तुकडा परत मिळावा म्हणून तो गेली अनेक वर्षे स्थानिक प्रशासनाचे दरवाजे ठोठावत होता; मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. मजुरीतून गोळा केलेला पै पै जमवून ते वकिलाला दिले आणि त्याने इस्लामपूर न्यायालयात दावा दाखल केला; पण न्यायालयातही तारीख पे तारीख पडत असल्याने तिथेही त्याची निराशा झाली.

अखेर मुंबईत तरी न्याय मिळेल, या मोठ्या आशेने तो मंत्रालयात आला होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती, त्यात तिकिटाला पैसेही नसल्यामुळे नायकू चक्‍क सायकलवरून सांगलीहून मुंबईला निघाला. तीन दिवस आणि दोन रात्र प्रवास करून तो पोहोचला. बेंगळूरु-पुणे आणि पुणे-मुंबई महामार्गावरून गाड्या 120 किलोमीटरच्या वेगाने धावत होत्या. त्याच रस्त्याने ऊन, वारा, पावसाला तोंड देत नायकूने मंत्रालय गाठले. केवळ कल्पनेने अंगावर शहारे यावेत, अशा या प्रवासाने त्याचे पाय अक्षरशः सुजले होते. त्यात पायात चप्पल नाही... अशा विपन्न अवस्थेत त्याची कहाणी त्याने मंत्रालयात मांडली. ती ऐकून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यासह कार्यालयातील सर्वच लोक हेलावले. 

तातडीने मदतीचे आदेश 
न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याने महसूलमंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी इस्लामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन केला. न्यायालयीन प्रक्रियेत नायकूची बाजू बळकट होण्यासाठी त्याला आवश्‍यक मदत करण्याचे निर्देश जाधव यांनी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. आता गावाकडे परत कसा जाणार, असा प्रश्‍न जाधव यांनी विचारल्यावर पाय सुजल्यामुळे दोन दिवस फूटपाथवर आराम करून मग जाईन, असे नायकू म्हणाला. यावर जाधव यांनी परतीच्या प्रवासासाठी पैसे दिले; तसेच एसटीच्या टपावर सायकल टाकून जाण्यास सांगितले. तोपर्यंत खासदार संजय पाटील वैयक्‍तिक कामासाठी आले होते. त्यांना प्रसंग कळताच त्यांनीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT