महाराष्ट्र

स्वयंपुनर्विकासासाठी एक खिडकी योजना - मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

मुंबई - हाउसिंग सोसायटीचे रहिवासी विकसक नसतात. त्यांना परवानग्या, प्रक्रिया, नियमावली यांची पुरेशी माहिती नसते. त्यांना स्वयंपुनर्विकासाच्या सर्व परवानग्या तातडीने मिळाव्यात, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या "एक खिडकी योजने'अंतर्गत देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्वयंपुनर्विकास अभियानाचे उद्‌घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईतील लाखो रहिवासी पुनर्विकासाच्या विवंचनेत आहेत. अनेकांनी विकसकांना इमारती रिकाम्या करून दिल्या आहेत. अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे परवानग्यांच्या फेऱ्यात आणि विकसकांच्या मनमानीमुळे अडकले आहेत. या सर्व रहिवाशांसाठी मुंबई बॅंकेने एक अभिनव योजना आखून मोठी संधी दिली आहे. अधिकाधिक हाउसिंग सोसायट्यांनी या जनहिताच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही योजना अधिक विश्‍वासार्ह व्हावी, यासाठी म्हाडा आणि मुंबई बॅंकेने मिळून रहिवाशांकरिता प्रशिक्षण कार्यशाळा सुरू कराव्यात. त्यात प्रस्ताव कसा बनवावा, प्रक्रिया, नियमावली काय असते याची सविस्तर माहिती रहिवाशांना द्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. या वेळी "म्हाडा'चे माजी अध्यक्ष व आर्किटेक्‍ट चंद्रशेखर प्रभू आणि निखिल दीक्षित यांनी स्वयंपुनर्विकासाची सविस्तर माहिती दिली. या वेळी "म्हाडा'चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. 

"म्हाडा' होणार नियोजन प्राधिकरण 
मुंबईचा पुनर्विकास रखडण्यास विविध परवानग्यांतील विलंब हे एक प्रमुख कारण आहे. पुनर्विकासाला गती देण्यासाठी "म्हाडा'ला नियोजन प्राधिकरण लागू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT