महाराष्ट्र बातम्या

एसटीच्या सर्व बसमध्ये ऑक्‍टोबरपर्यंत वायफाय 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईसह देशभरातील रेल्वे स्थानकांवर वायफाय हॉटस्पॉट सेवा दिली जात असतानाच एसटी महामंडळानेही एसटी बसमध्ये वायफाय सुविधा सुरू केली आहे. आतापर्यंत एसटीच्या 5,900 बसमध्ये वायफाय बसवण्यात आले आहे. प्रवाशांनी त्याद्वारे बॉलिवूड चित्रपट पाहण्यास अधिक पसंती दिली आहे. ऑक्‍टोबर 2017 पर्यंत एसटीच्या सर्व बसमध्ये ही सुविधा दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

सुखकर प्रवासासह प्रवाशांची करमणूक व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. त्याचे काम यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीला देण्यात आले. एसटी महामंडळाकडे सध्या 18 हजार बस आहेत. त्यातील 5,900 बसमध्ये वायफाय बसवण्यात आले आहे. यात निवडक अशा मराठी, हिंदी चित्रपटांसह गाणी, कॉमेडी मालिका असून प्रवासी यातील कोणताही पर्याय निवडून आपल्या मोबाईलवर ते पाहू शकतात. 100 हिंदी चित्रपट, 20 ते 25 मराठी चित्रपट, 20 अन्य भाषिक चित्रपट आणि पाच ते सात मालिकांचा पर्याय प्रवाशांना देण्यात आला आहे. प्रवाशांनी हिंदी चित्रपटांना अधिक पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ मराठी चित्रपटांसह डब केलेल्या अन्य भाषिक चित्रपटांचा क्रमांक लागतो. एसटी महामंडळाने संबंधित कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे. या कंपनीकडून एसटी महामंडळाला दर वर्षी 1 कोटी 5 लाख रुपये मिळणार आहेत. 

दिवसाला एका बसच्या प्रत्येक फेरीमागे 10 ते 12 प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत. सहा महिन्यांत 16 लाख हिट्‌स मिळाले. मुंबई, ठाणे, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, धुळे, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि सांगलीतून सुटणाऱ्या काही बसमध्ये वायफाय हॉटस्पॉट सुरू आहे. 

ऑक्‍टोबरपर्यंत एसटीच्या सर्व बसमध्ये वायफाय हॉटस्पॉट सुविधा दिली जाईल. या सुविधेमुळे प्रवाशांची चांगली करमणूक होत आहे. 
- नितीन कानुंगो,  व्यवस्थापकीय संचालक, यंत्र मीडिया सोल्युशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT