Corona_Patient 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; 25 दिवसांत चौपट रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या २५ दिवसांत राज्यातील कोरोनाचे रुग्ण २० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत ही वाढ चार पटीने असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. राज्यातील कोविडमध्ये गेल्या २५ दिवसांत २०.३२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ४ ते २८ फेब्रुवारीला नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत मार्चच्या आकडेवारीत सहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. राज्यभर चाचण्यांची संख्या वाढत असल्याने आकड्यांत भर पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय कोविड नियमांचे पालन न करणारे नागरिकही या वाढीस कारणीभूत आहेत. आकडेवारीनुसार १ ते २५ मार्चदरम्यान राज्यात ४,३९,३६६ रुग्ण नोंदले गेले. त्यातुलनेत ४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान १,१९,०६८ रुग्णांची नोंद झाली होती. या आकडेवारीनुसार राज्यात चार पटीने जास्त रुग्णसंख्या वाढली आहे.

राज्यात सर्व प्रकारच्या लक्षणांसाठी चाचण्या केल्या जात आहेत. ज्यांना लक्षणे आढळतात त्यांच्यावर उपचार करून निदान केले जाते. चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे.
- डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक

राज्यात चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढणे गरजेचे असून, जास्तीत जास्त संपर्क ट्रेसिंग होणे आवश्‍यक आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजेच जर लवकर संपर्क ट्रेसिंग केले तर त्यांना विलगीकरण करून परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.
- डॉ. सुभाष साळुंके, कोविडचे राज्य सल्लागार

चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्ण वाढल्याचे दिसते. पुढील किमान १० ते १५ दिवस ही संख्या वाढेल. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात दुसरी लाट सुरू झाली आहे; पण काळजी करण्याची गरज नाही. जवळपास २५ टक्‍क्‍यांपर्यंत चाचण्या वाढवल्या आहेत. आपण सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे.
- डॉ. गौतम भन्साळी, समन्वयक, खासगी रुग्णालय

चाचण्यांमध्ये जवळपास ६० टक्के वाढ झाली आहे. उपलब्ध वैद्यकीय पायाभूत सुविधांमुळेच ही वाढ कायम ठेवू शकतो. मुंबईत दररोज चाचणी ५० हजार ते ६० हजारपर्यंत चाचण्या केल्या जात आहेत. लसीकरणाचाही वेग वाढत आहे.
- सुरेश काकाणी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT