Maharashtra Omicron Cases
Maharashtra Omicron Cases esakal
महाराष्ट्र

राज्याची चिंता वाढली; एकाच दिवसात ओमिक्रॉनचे ८५ रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात आज एकाच दिवसात ओमिक्रॉनचे ८५ रुग्ण (Maharashtra Omicron Cases) आढळून आले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण मुंबईतील (Mumbai Omicron Cases) आहेत. तसेच आज तब्बल ३ हजार ९०० कोरोनाच्या (Maharashtra Corona Cases) नवीन रुग्णांची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी अत्यंत खाली गेलेला कोरोना रुग्णांचा आकडा अचानक चार हजारांवर पोहोचल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

कुठे किती रुग्ण? -

आज ३ हजार ९०० कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून तब्बल २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात सध्या १४, ०६५ सक्रीय रुग्ण आहेत. पण, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. याच महिन्यात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता आणि आज एकाच दिवसात ८५ रुग्ण आढळल्याने सर्वांना धडकी भरली आहे. यामध्ये मुंबईत ३४ रुग्ण, नवी मुंबई आणि पुणे महापालिकेत प्रत्येकी २ रुग्ण, नागपूर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी १, पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच इतर ३८ रुग्णांचा अहवाल हा इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चकडून प्राप्त झाला आहे. यामध्ये मुंबईतील १९ आणि पनवेलमधील ५, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी ३, वसई विरार आणि पुणे महापालिकेतील प्रत्येकी २, पुणे ग्रामीण, भिवंडी, पणवेल आणि ठाणे महापालिका हद्दीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत २५२ ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांचा विस्फोट -

मुंबईत आज कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय का? अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

CSK vs RR : थाला चेन्नईमध्ये शेवटचा IPL सामना खेळणार? गतविजेत्या CSK चा लौकिक पणास; राजस्थानसमोर लागणार कस

Rahul Gandhi Accepts Challenge: आव्हान स्वीकारलं! PM मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी राहुल गांधी तयार, म्हणाले, 'पण ते...'

Nasa Solar Flares : सूर्यावरील मोठ्या स्फोटांमुळे पृथ्वीवर आलं सौरवादळ; नासाने शेअर केले फोटो..

Mothers Day 2024 : तब्बल एक हजारांहून अधिक मातांकडून 'दूध दान'; काय खासियत आहे मिल्क बॅंकेची?

SCROLL FOR NEXT