Omicron variant Sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ओमिक्रॉनचे आणखी 2 रुग्ण; जाणून घ्या सविस्तर माहिती

पुणे आणि लातूर मध्ये ओमिक्रॉन रुग्ण

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचे आणखी 2 रुग्ण (Omicron patients) आढळले असून एकूण रुग्णसंख्या 20 वर पोचली आहे. आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी 2 रुग्ण ओमिक्रॉन (two more omicron patient) बाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे (pune) येथील आणि एक रुग्ण लातूर (Latur) येथील आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण 20 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यात मुंबई - 5, पिंपरी चिंचवड 10, पुणे मनपा 2 कल्याण डोंबिवली -1 नागपूर 1 आणि लातूर 1 रुग्णांचा समावेश आहे. यापैकी 9 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्यात मुंबईतील 3 रुग्णांचा समावेश आहे.

आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या 2 रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत. पुणे येथील 39 वर्षाची महिला तर लातूर येथील 33 वर्षाचा पुरुष रुग्ण आहे.सध्या हे दोन्ही रुग्ण विलगीकरणात असून त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास दुबई येथे झाला आहे. या दोन्ही रुग्णांचे प्रत्येकी 3 निकटसहवासित कोविड निगेटिव्ह आले असून दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

या शिवाय राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 107 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 20 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT