Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Police AI: महाराष्ट्र पोलीस बनणार देशात अत्याधुनिक; AI चा वापराबाबत फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरुन कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची चर्चा सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरुन कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची चर्चा सुरु आहे. पण हीच परिस्थिती सुधारण्यासाठी आता महाराष्ट्र पोलीस कात टाकण्याच्या तयारीत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, पोलीस दलात आता आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचा वापर अर्थात AIचा वापर करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Maharashtra Police AI Module Devendra Fadnavis gave detailed information about use of AI)

फडणवीस म्हणाले, इफेक्टिव्ह आणि इफिशिअन्ट पोलिसिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्याला कसा करता येईल? यासंदर्भात गेले अनेक महिने एक प्रोजेक्ट आम्ही तयार करत होतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर यांच्यासोबत हा प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे. ज्यामध्ये आपण एक कंपनी तयार केलेली आहे की जी पूर्णपणे आर्टिफिशियलचा उपयोग करण्यासाठी काम करेल. एखादा गुन्हा घडला असेल तर तो गुन्हा सोडवण्याकरता आपल्याला उपाययोजना करणारं मॉडेल आपण तयार केलं आहे, त्याचं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं.

यावेळी या अधिकाऱ्यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत त्याद्वारे आपण लवकरात लवकर या संपूर्ण प्रोजेक्टमुळं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे किंवा एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराचं विश्लेषण करणे, सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर एखाद्या ठिकाणी वाहनाची नंबर प्लेटची ओळख पटवणे. तसंच जर कॅमेरा नसला तरी देखील AIचा उपयोग करून आपण ती ओळखू शकतो का? याचा विचार करण्यात आला.

त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे सायबर क्राईम्स आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो डेटा अॅनेलेसिस करावं लागतं ज्याला अनेक महिने लागतात ते कामही काही मिनिटांत करण्याची ताकद ही आर्टिफिशल इन्टेलिजन्सची आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात गुन्हे प्रकटीकरण करताना आपल्याला त्याचा फायदा होणार आहे.

ट्राफिक मॅनेजमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला एआयचा फायदा होणार आहे. देशातल्या सगळ्यात आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर आपण आपलं सुरू केलं आहे, जे आता लवकरच सुरू होत आहे. ज्याची जवळपास सगळी कामं पूर्ण झाली आहेत. त्यामुळं या सगळ्या कॅपॅसिटी तयार झाल्यानंतर देशांमध्ये सर्वात आधुनिक अशा प्रकारचं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्राचा असेल आणि कायदा सुव्यवस्था याचबरोबर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी त्याचा चांगला उपयोग होईल, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT