Maharashtra Police Sakal
महाराष्ट्र बातम्या

"राज्यात काही अदृश्य गृहमंत्री"; पोलीस बदल्यांच्या गोंधळावरून भाजपाचा हल्लाबोल

नैतिकतेचा, प्रशासनाचा, गुणवत्तेचा ऱ्हास, प्रशासनाचा दर्जा घसरवण्याचं काम या सरकारचं सुरू आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश काल काढण्यात आले होते. मात्र त्याला १२ तासही लोटले नसताना पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गृहखात्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भाजपाने यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,"अजब सरकारची गजब कहाणी आहे. पोलीस विभाग ज्याच्यामुळे अनुशासन असतं. खरंतर एखाद्या मंत्र्याच्या नाराजीने बदल्या स्थगित होतात. याच्यापेक्षा जास्त प्रशासकीय व्यवस्थेचं अधःपतन असू शकत नाही. राज्यात वळसे पाटलांच्या रुपात एक नामधारी गृहमंत्री आहे, ज्यांचं कोणी ऐकत नाही. कुणीही उठतं आणि त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करतं. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत, ज्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड आपण बघितलेत, जे फोनवर आदेश देतात. काही अदृश्य गृहमंत्री आहेत,पोलिसांचं राजकीयीकरण सुरू आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, "पहिल्यांदा भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा जो पवित्र गणवेश आहे, या खाकी गणवेशाचा उपयोग वसुलीसाठी करण्यात आला. ज्यांनी भ्रष्टाचार मोडून काढायचा, त्यांच्या हातून भ्रष्टाचार करायला लावणारं हे निर्दयी सरकार आहे. आज पोलीस विभागाचं एवढं राजकीयीकरण झालंय की आधी पोलिसांना विचारलं जातं, तुम्ही काही कारवाई करणार असाल, कायदेबाह्य वागणार असाल, आम्ही सांगू तसं ऐकणार असाल, तर आम्ही तुम्हाला चांगली पोस्ट देतो. नैतिकतेचा, प्रशासनाचा, गुणवत्तेचा ऱ्हास, प्रशासनाचा दर्जा घसरवण्याचं काम या सरकारचं सुरू आहे. पुन्हा गाडी रुळावर आणण्यासाठी २५ वर्षे लागतील".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT