Maharashtra Police esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Police: उत्कृष्ट तपासात महाराष्ट्र पोलिसांना एकही पदक नाही, केंद्राने जाहीर केली यादी

Sandip Kapde

Maharashtra Police : गृहमंत्रालयाने 2023 मध्ये उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली. त्यामध्ये यंदा राज्य पोलिंसासह मुंबई पोलिसांना एकही पदक मिळाले नाही. देशभरातील 140 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली.

महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले. मात्र महाराष्ट्राला यंदा पदकं मिळाले नाहीत. यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत.

गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पोलिसांना 11 पदकं मिळाली होती. मात्र यंदा एकही पदकं मिळाली नाही. यंदा 140  पदकं विविध विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. मात्र महाराष्ट्राती एकाही अधिकाऱ्यांचे यात नाव नाही.

वर्ष 2023 साठी "केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपासासाठी" 140 पोलीस कर्मचार्‍यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे पदके देण्याचा उद्देश गुन्ह्याच्या तपासातील अधिकाऱ्यांना मानकांन, प्रोत्साहन देणे आणि तपासातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याचा आहे. दरवर्षी 12 ऑगस्टला याची घोषणा केली जाते. (Maharashtra Police News)

हे पुरस्कार प्राप्त करणार्‍या अधिकाऱ्यांमध्ये 15 सीबीआय, 12 एनआयए, 10 उत्तर प्रदेश, 09 केरळ आणि राजस्थान, 08 तामिळनाडू, 07 मध्य प्रदेश आणि 06 गुजरात आणि उर्वरित इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये 22 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT