Police Bharati 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Police Bharati 2022: राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलली

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलल्याची माहिती आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरती पुढे ढकलली असल्याचं सांगण्यात येतंय. पुढील महिन्यामध्ये १४ हजार ९५६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती.

आता पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

दरम्यान, कालच राज्याच्या पोलिस मुख्यालयातून प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. रिक्त १४ हजार ९५६ जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ हजार ८११ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ हजार ३५० जगा, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी ४२६ जागा, भटक्या जमाती (ब)साठी ३७४ जागा, भटक्या जमाती (क) साठी ४७३ जागा, भटक्या जमाती (ड) साठी २९२ जागा, विमुक्त मागास प्रवर्गासाठी २९२ जागा, ओबीसींसाठी २ हजार ९२६ जागा, ईडब्ल्यूएससाठी १ हजार ५४४ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार ४६८ जागा; असं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं होतं.

कुठे किती रिक्त जागा?

मुंबई - 6740, ठाणे शहर - 521, पुणे शहर - 720, पिंपरी चिंचवड - 216, मिरा भाईंदर - 986, नागपूर शहर - 308, नवी मुंबई - 204, अमरावती शहर - 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई - 620, ठाणे ग्रामीण - 68, रायगड -272, पालघर - 211, सिंधूदुर्ग - 99, रत्नागिरी - 131, नाशिक ग्रामीण - 454, अहमदनगर - 129, धुळे - 42, कोल्हापूर - 24, पुणे ग्रामीण - 579, सातारा - 145, सोलापूर ग्रामीण - 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड - 155, परभणी - 75, हिंगोली - 21, नागपूर ग्रामीण - 132, भंडारा - 61, चंद्रपूर - 194, वर्धा - 90, गडचिरोली - 348, गोंदिया - 172, अमरावती ग्रामीण - 156, अकोला - 327, बुलढाणा - 51, यवतमाळ - 244

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

SCROLL FOR NEXT