Ajit Pawar - Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजित पवारांचं भाष्य; म्हणाले, निकाल काहीही लागला तरी...

शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर उद्या सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल सुनावणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. पण तत्पूर्वी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाची भूमिका काय असू शकते यावर त्यांनी भाष्य केलं. तसेच आपलं वैयक्तिक मत काय आहे? हे देखील त्यांनी सांगितलं. (Maharashtra Political Crisis Ajit Pawar Comment Before Result of SC)

अजित पवार म्हणाले, "ही गोष्ट गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये घडली आता जवळपास अकरा महिने झाले आहेत. आपण सर्वजण वाट पाहात होतो की कधी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो. आता अखेर उद्या यावर निर्णय येणार आहे. निकाल काहीही लागला तरी माझं स्वतःच मत आहे की, सुप्रीम कोर्ट यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता असेल. मी काही मोठ्या वकिलांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं की, विधीमंडळातील ही बाब आहे त्यामुळं विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता नाकारता येत नाही"

म्हणून सरकारला धोका नाही - पवार

आजच्या घडीला त्यांच्याकडं १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे. मधल्या काळात खूप जणांनी वेगवेगळी वक्तव्ये केली की घटनाबाह्य सरकार वैगरे. पण ते सरकार चालवत आहेत, त्यांनी अर्थसंकल्प घेतला, बहुमतानं बसलेल्या सरकारच्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत असल्याचं आपण गेल्या अकरा महिन्यांपासून पाहत आहोत. १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्याकडं जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी पुन्हा मुंबईकडे कूच; आंदोलनासाठी जरांगे पाटलांची मोठी रणनीती, मराठा कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना

Duleep Trophy 2026: वैभव सूर्यवंशीचे शतक थोडक्यात हुकले... फटका चुकला, सीमारेषेवर झेल टिपला; हताश झालेल्या पोरानं बॅट फेकली

Nepal Tragedy: नेपाळ आपत्तीनंतर उत्तराखंड अलर्ट! १३ हिमनदी तलाव फुटण्याचा धोका, पूर्वसूचना यंत्रणेसाठी ३० कोटींचा निधी

Marathi News Live Updates : ५८ लाख नोंदी नाही, शिंदेंनी फसवलं असं फडणवीसांनी सांगितलं - मनोज जरांगे पाटील

ITR Filing Deadline: आज ITR भरण्याची शेवटची संधी! चुकल्यास 5,000 दंड, कोणाला लागू आहे 31 ऑगस्टची मुदत? नोकरदारांनाही लागू?

SCROLL FOR NEXT