Mahesh Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

'तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला'; शिंदेंनी सांगितलं बंडखोरीचं 'कारण'

सकाळ डिजिटल टीम

बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Maharashtra Political Crisis Eknath Shinde : शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे दररोज ट्विटव्दारे ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन ठाकरे सरकारला इशारा दिलाय. त्यांच्याच शिंदे गटातील कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदेंनी (Mahesh Shinde) आम्ही का आक्रमक भूमिका घेतली याचं स्पष्टकरण त्यांनी एकनाथ शिंदेंच्या ट्विटर अकाउंटमधून दिलंय.

महेश शिंदे स्पष्टकरण देताना म्हणाले, सर्व आमदारांची एक बैठक वर्षा निवासस्थानी झाली. आम्ही (शिवसेना आमदार) सगळे एकत्र होतो. त्या बैठकीवेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकाऱ्यांच्या समोर मतदारसंघात किती पैसे दिले, याचे आकडे मागितले. त्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीचे आकडे दिले. त्यावेळी मुख्यमंत्रीसुध्दा खरे आकडे पाहून अचंबित झाले. तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी आमचा विश्वास घात केला. परंतु, त्यांच्यात काही बदल झाला नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय.

शिंदे पुढं म्हणाले, 700 ते 800 कोटी निधी त्यांच्या (राष्ट्रवादी आमदार) मतदारसंघात दिला जात होता. आमच्याकडं वारंवार दुर्लक्ष केलं जात होतं. आम्ही जे राष्ट्रवादीचे उमेदवार पाडले आहेत, त्यांना दुप्पट निधी मुख्यमंत्री कार्यालयातून दिला जात होता. निधी दिला जात तर होताच आणि कोणत्याही कार्यक्रमाला आम्हाला बोलवंल जात नव्हतं. आमच्या तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या. मात्र, आम्हाला कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं खरं, पण कोणताही बदल झाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्टेला केराची टोपली दाखवली गेली आणि विरोधकांची विकासकामं करण्यात आली, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सध्या आमदार महेश शिंदे एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT