Amey Khopkar
Amey Khopkar sakal media
महाराष्ट्र

"सेटवर पैसे गोळा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी देतो"

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey khopkar) यांनी उडी घेतली आहे. यास्मिन वानखेडे (yasmin wankhede) यांच्यावरील बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही. ज्या ज्या सेटवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन पैसे गोळा करतात त्याची यादी देतो. त्यांच्यावर कारवाई करा, असे आव्हानच खोपकर यांनी दिले आहे.

‘महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी मनसे चित्रपट सेनेत काम करणाऱ्या यास्मिन वानखेडे यांच्यावर तथ्यहीन आरोप केला. मनसे चित्रपट सेनेवर मलिक यांनी जे आरोप केले, त्याचे पुरावे आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला. एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली, त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का, असा सवाल खोपकर यांनी करत मलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

समीर वानखेडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याचा आम्हाला अभिमान आहे. अमली पदार्थांविरोधात काम करणाऱ्या वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यास्मिन वानखेडे यांच्यावर यापुढे बिनबुडाचे आरोप आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे ज्या ज्या सेटवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन पैसे गोळा करतात, त्याची यादी देतो. त्यांच्यावर कारवाई करा, असे आव्हानच खोपकर यांनी दिले आहे.

...तर न्यायालयात खेचणार!
यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ‘नवाब मलिक यांनी माझी सुरू केलेली अकारण बदनामी थांबवावी; अन्यथा त्यांना बांगड्या भेट म्हणून पाठवेन. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी माझी बदनामी करणं थांबवावं, नाही तर नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयीन कारवाईचा इशारा यास्मिन वानखेडे यांनी दिला. नवाब मलिक हे मला ‘लेडी डॉन’ म्हणतात. कुठल्या पुराव्यांनिशी त्यांनी माझ्यावर हा आरोप केला आहे, असा सवाल यास्मिन यांनी विचारला आहे.

महिलांचा आदर ठेवा...
नवाब मलिक यांनी माझ्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर जाऊन माझे पर्सनल फोटो त्यांच्या ट्विटरवर शेअर केले, हे त्यांना शोभत नाही. महिलांचा आदर ठेवायला शिका, असे म्हणत यास्मिन वानखेडे यांनी मलिक यांना खडे बोल सुनावले. एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर तुम्ही संशय घेत आहात, ही बाब योग्य नाही. समीर वानखेडे चांगले काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT