Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: जयंत पाटलांच्या 'त्या' विधानाला अजित पवारही सहमत, पण...

कथित नाराजी नाट्यानंतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चा

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागलं आहे. भावी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असणार असा ठोस दावा कार्यकर्ते करताना दिसत आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानाला सहमती दर्शवली आहे. पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. (Maharashtra Politics Ajit Pawar Jayant Patil big statement CM)

कथित नाराजी नाट्यानंतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चा आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. तर खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील यांचा चेहरा योग्य असल्याचे म्हटले आहे.

अशातच, जयंत पाटील यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असणार असं म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो, असं अजितदादांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार, पण नक्की कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले असून येत्या काळात राज्याच्या राजकारणात उलटफेर होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येतीये. त्यापूर्वी एका मुलाखतीत अजित पवार यांनीदेखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT