Maharashtra Politics Ajit pawar Sharad Pawar photo on girish mahajan birth birthday poster  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'जिवाभावाचा माणूस...' BJP नेत्याचा वाढदिवस, पोस्टरमध्ये पवारांसह अजितदादांचा फोटो

राज्यात पुन्हा खळबळ

धनश्री ओतारी

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. भाजपच्या बड्या नेत्याच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका नेमकी कुणाच्या बाजूने? असा सवाल उपस्थित होत आहे.(Maharashtra Politics Ajit pawar Sharad Pawar photo on girish mahajan birth birthday poster )

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने उधाणं आलं होतं. अशातचं शरद पवार यांच राजीनामा नाट्य पाहायला मिळालं. त्यानंतर मविआमध्ये फूट पडण्याच्या चर्चे जोर धरला. अशातच आता भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत शरद पवारांसह अजितदादांचा फोटो दिसल्याने राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत. पण या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे.

उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही छोटा छापण्यात आला आहे. मात्र, अजित पवार यांचा मोठा फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एवढेच नव्हे तर अजितदादांच्या फोटोखाली जिवाभावाचा माणूस असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

Maharashtra Politics

तसेच, याच जाहिरातीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे. पवार-मोदींच्या फोटो खाली अजित पवार, फडणवीस आणि महाजन यांचा तिघांचा एकत्रित फोटोही छापण्यता आला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही जाहिरात दिली आहे. त्यावर या बँकेचे चेअरमन संजय पवार यांचाही फोटो आहे. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांचाही फोटो आहे. मात्र, भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या फोटोत अजितदादा आणि शरद पवार यांचे फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT