अमित देशमुख  sakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Deshmukh: आता चौथं सरकार...भाजप प्रवेशावर अमित देशमुखांचे सूचक वक्तव्य

भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर अमित देशमुख यांनी मौन सोडलं

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. यापुर्वीही अनेकदा अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेवर अखेर अमित देशमुख यांनी मौन सोडत भाजपला चांगलच ठणकावलं आहे. ( Maharashtra Politics Amit Deshmukh first reaction rumors about BJP joining)

राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हंटलेलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

दरम्यान, “कितीही वादळं आली तरीही लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार”, अशा शब्दात अमित देशमुख यांनी भाजपला सुनावलं आहे.

काय म्हणाले अमित देशमुख?

'अडीच वर्षात तीन सरकार बदलली, चौथं कधीही येऊ शकेल', असं सूचक वक्तव्य देशमुख यांनी केलं आहे. अरे ही पाच वर्ष खरंच चमत्कारीच राहिली. आता जे सुरु आहे ना, ते तिसरं सरकार सुरु आहे. पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षांचं, आणि आता हे तिसरं सुरु आहे. चौथं कधीही येऊ शकेल. काहीही सांगता येत नाही.

मला तुमच्या घरी या म्हणताय. तुम्ही स्वगृही यावं, असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक ठरेल. अस प्रत्युत्तर अमित देशमुख यांनी दिले आहे.

तसेच, कितीही वादळं आली, किती वारे आले तरी वाडा तो तिथेच होतो. तसंच कितीही वादलं आली तरी लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार. असा शब्दात अमित देशमुख यांनी सुनावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT