shiv sena leader arvind sawant  esakal
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई, काहींना केवळ सत्तेत येण्याची चिंता'

बंडखोर आमदारांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, की जेव्हा बेरोजगारी आणि महागाई असताना, तर काही लोकांना केवळ सत्तेत येण्याची चिंता आहे. शिवसेना प्रमुखांशिवाय त्यांचे (बंडखोर आमदार) अस्तित्वच राहू शकत नाही आणि त्यांना कोणी विचारणारही नाही, अशी घणाघाती टीका खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर केली. (Maharashtra Politics Arvind Sawant Says In State Unemployment, Inflation But Some Want Power)

मुंबईत (Mumbai) ते शनिवारी (ता.२५) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले त्यातील (बंडखोर आमदार) काही जणांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना इतके दूर आसाममध्ये घेऊन जाण्यात आले आहे. अनेक आमदार आम्हाला सांगत आहेत, की त्यांना परत येण्याची इच्छा आहे. (Maharashtra Politics)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या प्रसंगी पाच ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही. पक्षातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. पाच पैकी ही दोन महत्त्वाचे ठराव मानले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT