महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची आठवण; नारायण राणे म्हणाले...

नामदेव कुंभार

शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. दररोज दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनाची आठवण सांगितली. मी ठाकरे कुटुंबियांना त्रास देणार नाही, असा शब्द बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. त्यांनी ज्या हेतूनं तो शब्द माझ्याकडून घेतला होता ते मी सांगू शकत नाही. पण आज जे काही घडतंय त्यामुळे मला हे बोलावं लागतेय, असे राणे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे बोलत होते.

सध्या जे काही सुरु आहे ते शिवसेनेनं सगळे थांबवावे. उद्धव ठाकरे यांच्याशी माझं वैयक्तिक काहीही वाईट नाही. माझी प्रकरणं बाहेर काढायची आहेत तर काढा, मग 'त्या' हत्या करायला कुणी सांगितल्या याची पण चौकशी करा, असा खळबळजनक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या माध्यमातून सगळे करत आहेत. माझ्यावर अथवा माझ्या कुटुंबियांवर जर कोण बोललं तर मी कसा सोडणार? असा इशारा नारायण राणे यांनी दिला. संजय राऊत यांचा बोलवता धनी कोण? ते आधी तपासा. मी स्वभावाने आक्रमक आहे. मी आधी कधी आदित्य व उद्धवजींवर कधी बोललो नाही. पण आज बोलावं लागतंय. सामनामधून होणारी टीका थांबवली नाही तर प्रहार मधून उत्तर देणार. संजय राऊत शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत, असे राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT