महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari : पटोलेंच्या ऑफरवर गडकरींचं स्पष्टीकरण; म्हणाले,''मी...''

सकाळ डिजिटल टीम

नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असं विधान अलीकडेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता स्वतः गडकरींनी या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे.

नितीन गडकरी यांचं भाजपात खच्चीकरण केलं जात असेल, तर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, अशा ऑफर त्यांना दिल्या जात होत्या. त्यात पटोलेंनी गडकरींना थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा स्वयंसेवक आहे. मी आयुष्यभर माझ्या विचारांप्रमाणे काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता असल्याचे स्पष्टीकरण गडकरींनी दिले आहे. त्यामुळे गडकरी भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काय म्हणाले गडकरी?

“मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मी माझ्या विचारांसाठी राजकारणात आलो. त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता कायम राहिल असेही गडकरींनी स्पष्ट केले आहे आहे. मी माझ्या सिद्धांताप्रमाणे आणि विचाराप्रमाणे आयुष्यभर काम करणार असून, याबाबत माझ्या मनात स्पष्टता असल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT