BJP-Shinde 
महाराष्ट्र बातम्या

BJP-Shinde : आगामी निवडणुकीसाठी CM शिंदेंची स्ट्रॅटेजी काय? बड्या नेत्याने सांगितला आकडा

राजकीय वर्तुळात जागा वाटपावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

पुढील वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात जागा वाटपावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत वाद पेटला असल्याचे पाहायला मिळत आहे. (maharashtra politics BJP Shinde shiv sena)

चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप २४० विधानसभा जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केवळ ५० आमदार आहेत. त्यांना यापेक्षा जास्त जागांची गरज नाही, असे बावनकुळे म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप शिंदे युतीत फुट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार याचा आकडाच सांगितला आहे.

टी व्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, कोण नेता काय घोषणा करत असेल याला काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत झालेला युतीचा हा विषय आहे. आम्ही 130 ते 140 जागा लढवणार आहोत. असा आकडा सांगत गायकवाड यांनी बावनकुळेंच्या वक्तव्याला धुडकावून लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT