Dead Body esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू

मुंबईतील मुलुंडमध्ये एका ३१ वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. एका धार्मिक कार्यक्रमासाठी ते मंदिरात गेले असताना ही घटना घडली. त्या व्यक्तीला फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अहवाल दाखल करून तपास सुरू केला आहे.

मनसेनेकडून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांविरोधात पदयात्रा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात आंदोलन उभं केलं आहे. रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांविरोधात मनसेकडून पदयात्रा काढली जाणार आहे. यात राज ठाकरे देखील सामील होणार आहेत.

भारतीय वायुसेनेकडून शंभराहून अधिक 'तेजस'लढाऊ विमांनाची ऑर्डर

भारतीय वायुसेनेने शंभराहून अधिक तेजस लढाऊ विमानांची ऑर्डर दिली आहे.

आठवड्यातील ३ दिवस चालणार अजित पवार गटाचा जनता दरबार

मंगळवार,बुधवार आणि गुरुवार हे ३ दिवस मंत्रालयासमोरील A4 बंगल्यात भरणार जनता दरबार भरणार आहेत. जनता दरबारच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवाराशिवाय इतर सगळ्या मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. जनता दरबरच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार गट जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मध्ये बैठक सुरु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत कांदा प्रश्नावर चर्चा करण्यात येऊ शकते.

मुंबईतील बैठकीत 'इंडिया'आघाडीच्या लोगोचे होणार अनावरण

भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारविरोधात तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीकडून लोगो जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईतील बैठकीत या लोगोचं अनावरण करण्यात येईल.

विश्वविजेता! भारताच्या प्रज्ञानानंदचा पराभव करत मॅग्नस कार्लसन बनला चॅम्पियन

मॅग्नस कार्लसनने बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे. भारताच्या 18 वर्षाच्या प्रग्नानानंद याचा पराभव झाला आहे. दोन्ही डाव ड्रॉ झाले पण वेळेच्या अनुमानानुसार प्रग्नानानंदने हा सामना गमावला

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचा लाईव्ह थरार...

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत डंका वाजवेल का हे पाहावं लागणार आहे. आर. प्रग्नानानंद हा भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. पहिला डाव भारताने वेळेच्या नियमानुसार गमावला आहे. सध्या दुसरा डाव आहे.

शरद पवारांनी सपत्निक घेतले म्हसोबाचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पुरंदरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी म्हसोबा मंदिराला भेट दिली आणि सपत्निक म्हसोबाचे दर्शन घेतले.

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - वडेट्टीवारांची मागणी  

मागच्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबून, कापूस पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हसन मुश्रीफांचा रोहित पवारांवर निशाणा

"रोहित पवारांना तिकडे अजित पवार यांची जागा घ्यायची असेल. ते नवखे आहे, ते कशासाठी एवढे धाडस करत आहेत? आरोप करायला जागा नसल्याने ते असे बारके आरोप करतात" असं मुश्रीफ म्हणाले. त्याचबरोबर उद्या शरद पवार यांच्या कोल्हापुरातील निर्धार सभेवर बोलताना "पवार साहेबांना एवढ्या छोट्या मैदानात आणायला नको होते. त्या मैदानात पाच हजार लोक बसू शकतील. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी याच आमच्या शुभेच्छा." असं ते म्हणाले.

पहिल्यांदा कुणीही कोर्टात जाणार नाही हे ठरले होते. पण बॅनरवरील फोटोवरून शरद पवार साहेब जर कोर्टात जाणार असतील तर काय करणार? अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवतीर्थावर मनसे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक

राज ठाकरे अन् अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थावर पार पडत आहे. जागर पदयात्रेच्या तयारी संदर्भातील ही बैठक आहे.

भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता निलंबित

जागतिक कुस्ती संघटनेने मोठी घोषणा केली असून भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता निलंबित करण्यात आली आहे. यामुळे भारतीय कुस्ती खेळाडूंना मोठा फटका बसणार आहे. 30 मे ला भारतीय कुस्ती संघाला जागतिक कुस्ती महासंघाने पत्र लिहून पुढील 45 दिवसात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निवडणूक न झाल्याने जागतिक कुस्ती संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

जपानच्या आर्थिक मंत्र्यांनी घेतली फडवणवीसांची भेट

जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे त्यांना आभार मानले. त्याचबरोबर वर्सोवा विरार सी-लिंक ला संपूर्ण सहकार्य करण्याचे जपानकडून आश्वासन देण्यात आले आहे.

कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी संतप्त

कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी एका किलोमागे २० ते २२ रूपयांचा खर्च येतो पण आज तेवढासुद्धा भाव बाजार समित्यामध्ये मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक ठिकाणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत.

राज्यातील सर्वपक्षीय 22 आमदार आजपासून युरोप दौऱ्यावर

राज्यातील सर्वपक्षीय 22 आमदार आजपासून युरोप दौऱ्यावर जाणार असून तब्बल 10 दिवसांच्या या दौऱ्यामध्ये स्त्री-पुरूष समानता, महिला सक्षमीकरण, मत्स्य व्यवसाय आणि दुग्धव्यवसायाचा अभ्यास करण्यात येणार आहे.

युरोपमधील जर्मनी, नेदरलँड्स आणि लंडन येथे अभ्यास दौरा असल्याची माहिती आहे. शिंदे गटातून आमदार मनिषा कायंदे या अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्टला बंगळूरूला जाणार

पंतप्रधान मोदी 26 ऑगस्ट रोजी इस्रो कार्यालयाला भेट देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उद्या रात्री पंतप्रधान परदेशातून भारतात परतणार असून चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर मोदी इस्रोला भेट देणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव कालवश! गंभीर आजाराशी झुंज अपयशी

सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांपासून अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. 

"अभिनयाची जाण असलेली देखणी शालीन नटी गेली, पहिल्या रोल पासून नाव केलं होतं, मराठी सिनेसृष्टी त्यांनी गाजवली, स्वभावाने छान, मी तर मोठ्या बहिणी समान मानत होतो." अशी प्रतिक्रिया जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दिली.

कांदा प्रश्नावरून राजकारण तापलं 

सध्या कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये ४० टक्क्याने वाढ केल्यामुळे राज्यातील वातावरण तापलं असून नाशिकमधील लासलगाव येथील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे. तर राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने, निषेध आणि निदर्शने सुरू आहेत.

हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर कायम

हिमाचल प्रदेशात पावासाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यातील इमारती कोसळल्या आहेत. इमारती कोसळतानाचा व्हिडिओ कॅमेरा मध्ये कैद असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात बैठक सुरू

मंत्रालयातील अजित पवारांच्या दालनात बैठक सुरू झाली असून बीड जिल्ह्यातील विकास कामे, प्रलंबित कामे आणि दुष्काळी परिस्थिती बाबत आढावा घेण्यात येत आहे.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आमदार प्रकाश दादा सोळंके, माजी आमदार अमर सिंह पंडित, संजय दौंड, राज किशोर मोदी हे देखील बैठकीला उपस्थित आहेत.

उद्या शरद पवारांची कोल्हापुरात निर्धार सभा

पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपला गट चांगल्या प्रकारे उभा करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन केले आहे. नाशिक, बीड नंतर ते आता कोल्हापुरात निर्धार सभा घेणार आहेत. या सभेत ते कोणती घोषणा करणार किंवा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

चांद्रयान - ३ मोहीम फत्ते करून भारताने जगात आपला इतिहास घडवला आहे. सर्वांत कमी खर्चात भारताने चांद्रयान मोहीम पूर्ण केली असून सर्व भारतीयांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. त्याचबरोबर रोव्हरही लँडर पासून वेगळे झाले असून पुढचे १३ दिवस हे यान संशोधनाचं काम चंद्रावर करेल. यासोबतच अनेक नेत्यांनी या मोहिमेनंतर शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांची उद्या कोल्हापुरात निर्धार सभा होणार आहे. महाराष्ट्रातील, देशातील आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट एका क्लिवर जाणून घ्या....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT