Eknath Shinde and Jayant Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या संपर्कात - जयंत पाटील

ठाकरे गटातले १३ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता.

वैष्णवी कारंजकर

ठाकरे गटातले उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत केला आहे. त्यावर एकनाथ शिंदेच आपल्या संपर्कात आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते उदय सामंत?

ठाकरे गटाचे उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे २० आमदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा आहे. काँग्रेसचे मोठे नेते महाबळेश्वरमध्ये शिंदेंना भेटले अशीही चर्चा आहे. चर्चा भरपूर होतात, पण ते सत्यात उतरायला हवं.

एकनाथ शिंदे आमच्या संपर्कात - जयंत पाटील

उदय सामंतांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी त्याला उत्तर दिलं आहे. पाटील म्हणाले, "संपर्कात सगळेच एकमेकांशी असतात, तसं एकनाथ शिंदे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात, ते काही खोटं नाही."

जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरतील - अमोल कोल्हे

नुकतंच एका सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरतील असं विधान केलं होतं. ते म्हणाले, "जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याचा मुख्यमंत्री म्हणून गरज असून ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील."

यावरही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले,"माझ्या सत्काराच्या भाषणात त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यात कोणाशी स्पर्धा करण्यात मत नाही. महाराष्ट्रात उत्साही कार्यकर्ते आहेत, त्यामुळे राज्यात पोस्टर लागतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निवडणूक की लिलाव? १५ कोटींची ऑफर, तरीही नकार! पैसे वाटपावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

सोलापुरातील धक्कादायक घटना! रिमांड होममधून अल्पवयीन मुलगा, तर घरगुती वादातून सखी वन टॉप सेंटरमध्ये आलेली विवाहिता बेपत्ता; पोलिस घेत आहेत दोघांचा शोध

Mumbai Politics: आरोप, वस्तुस्थिती आणि राजकीय संदर्भ... मुंबई खरंच विकली जातेय का? अदानी समूहावर बोट; पण वास्तव काय सांगतं?

Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर मध्यरात्री दरोडा; नोकरानेच आखला कट!

Cricket Retirement: डिव्हिलियर्सला पहिल्याच सामन्यात बाद करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; १२०+ विकेट्स नावावर

SCROLL FOR NEXT