Uddhav Thackeray and Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : शिंदेकडे संख्याबळ पण कंट्रोल ठाकरेंकडे; शिवसेना कोणाची होणार?

निकाल कोणाच्याही बाजूने लागू देत, पण पुढे काय?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे आता या कायदेशीर पेचाचं पुढे काय होणार, असा प्रश्न दोन्ही गटांना पडला आहे.

ही सुनावणी कशी होणार? कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? शिवसेना नक्की कोणाची होणार? सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाकडे काय पर्याय आहेत, या सगळ्याचा उहापोह करत कायदेशीर मार्गांची माहिती कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी 'सकाळ'शी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

बापट म्हणाले, "भारतात पक्षव्यवस्थेला खूप महत्त्व आहे. पक्षाला मान्यता किंवा चिन्ह देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. पक्षात अनेकदा फूट पडते. पक्षाला मान्यता देणे, हे निवडणूक आयोगाचं काम आहे, असं कोर्टाने सांगायला पाहिजे."

महाराष्ट्राचा विचार वेगळ्या रीतीने करावा लागेल, असं सांगताना बापट म्हणाले, "लवकरात लवकर दोघांनी म्हणजे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेंकडे संख्याबळ आहे पण संघटनात्मक नियंत्रण उद्धव ठाकरेंकडे आहे. आधी १६ जण अपात्र ठरतात की नाही, हे पाहायला हवं."

बापट पुढे म्हणतात,"दुर्दैवाने भारतात राज्यपाल, सभाध्यक्ष यांच्यावर विश्वास नाही. म्हणून काही जणांचं मत आहे की घटना बदलली पाहिजे. आधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा मग शिवसेना कोणाची हा निर्णय होईल. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला असं वाटलं तर मग सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT