महाराष्ट्र बातम्या

CM शिंदे दिल्लीला गेलेच नाहीत! गुपचूप दौरा केल्याच्या केवळ चर्चाच

मुख्यमंत्री बुधवारी दिल्लीला गेले ही केवळ अटकळ

धनश्री ओतारी

माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी दिल्लीला गेले असे वृत्त सध्या चर्चेत होते. दरम्यान, मुख्यमंत्री बुधवारी दिल्लीला गेले ही केवळ अटकळ असल्याचे सांगण्यात आले आहे.(maharashtra politics crisis CM Eknath Shinde did not go to Delhi tour)

बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाली. असे वृत्त राजकीय वर्तुळात चर्चेत आले.

दरम्यान, मुख्यमंत्री दिल्लीला गेले हे वृत्त खोटे आहे. बुधवारी चार्टर विमान बुक केले होते पण त्यामधुन शिंदे परिवारातले काही सदस्य दिल्लीला रवाना झाले. मात्र, मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच नाहीत. माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे एबीपी माझानं म्हटलं आहे

महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन वीस दिवस झाले आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातच हा विस्तार होण्याची चर्चा होती, पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर काही कारणांमुळे विस्तार रखडल्याचं बोललं गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rule Change: एलपीजी, पॅन-आधार अन्...; १ जानेवारी २०२६ पासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

सैराटमध्ये परश्यासोबत पहिल्यांदा दिलेल्या इंटिमेंट सीन बद्दल बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली...'मी घाबरुन...'

Navi Mumbai Crime: बोगस पासपोर्टसह व्हिसा जप्त, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई!

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

SCROLL FOR NEXT