Eknath Shinde - Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षासाठी आज महत्त्वाचा दिवस; 'या' दोन प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

संतोष कानडे

नवी दिल्लीः महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या राजकारणातला आज (सोमवार) महत्त्वाचा दिवस आहे. मागील अनेक महिन्यांपासून खोळंबलेली सुनावणी आज होतेय. सुप्रीम कोर्टामध्ये CJI चंद्रचूड यांच्यासह इतर न्यायाधीशांसमोर दोन सुनावण्या लागोपाठ होतील.

मागच्या वर्षी शिवसेना पक्षामध्ये मोठं बंड झालं. पक्षाचे ४० आणि १० अपक्ष आमदार घेऊन एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली होती. मात्र त्याप्रकरणात कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली.

मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होत असून विधानसभा अध्यक्षांना याप्रकरणी योग्य ते निर्देश देण्यासंबंधी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा सुनावण्या झालेल्या आहेत तेव्हा राहुल नार्वेकरांकडून काहीतरी कार्यवाही झालेली आहे.

दुसरं प्रकरण निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिल्याने आयोगाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्याने सुप्रीम कोर्ट त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार का? हे पाहावं लागेल.

सीजेआय धनंजय चंद्रचूड, जेबी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या कोर्टासमोर लागोपाठ दोन्ही सुनावण्या होणार आहेत. कोर्ट क्रमांक १८ आणि १९ मध्ये या सुनावण्या होतील. त्यामुळे ठाकरे गट आणि राज्यातील सत्तासंघर्षासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर! ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ तगड्या संघांना भिडणार

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

Shadashtak Yoga 2026: 13 फेब्रुवारीला तयार होणार षडाष्टक योग! मेष राशींबरोबर 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

SCROLL FOR NEXT