ajit pawar  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar:पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा अजित पवार यांचा राजीनामा, जाणून घ्या कारण..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

मिलिंद संगई, बारामती

Ajit Pawar Resign:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी, उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप यामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याच्या कारणामुळे अजित पवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

अजित पवार हे बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून गेली 32 वर्षे बँकेचे प्रतिनिधित्व करत होते. 1991 पासून अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठी आर्थिक प्रगती केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये देशातील सर्वात अग्रगण्य बँक म्हणून पुणे जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे.

अजित पवार यांचा वाढता व्याप विचारात घेता त्यांना बँकेच्या कामकाजाकडे वेळ देणे शक्य होत नसल्यानेच त्यांनी संचालक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार 1991 मध्ये जिल्हा बँकेचे संचालक झाले, त्यावेळेस बँकेचा एकूण व्यवसाय 558 कोटी रुपये इतका होता मात्र अजित पवारांनी सूत्र हाती घेतल्यानंतर आज या बँकेचा व्यवसाय 20714 कोटी रुपये इतका विस्तारला आहे. हा व्यवसाय देखील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक आहे.

अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असता तरी या पुढील काळात देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांच्याच नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करेल असे दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्ट केले आहे.अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांच्या जागेवर ते कोणाला संधी देतात याबाबत देखील औचूक निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT