Rohit Pawar Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : कुरापतीनंतरही अपेक्षित यश मिळत नसल्याने झोप उडाली असेल; 'सकाळ सर्व्हे'वरून रोहित पवारांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सकाळ माध्यम समूहाने नुकताच राज्यातील राजकीय परिस्थीतीवर सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये अनेक धक्कादायक कल समोर आले आहेत. या सर्व्हेमध्ये राज्याच्या राजकारणात झालेले बंड खरच मतदारांना आवडले का? पुढीला काळात महाराष्ट्रातील जनतेचा कल कोणाकडे याची माहिती घेण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारा हा सर्व्हे असल्याचं म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, एका माध्यमसमूहाच्या कालच्या सर्व्हेने महाराष्ट्राच्या जनतेचा मूड दाखवून दिला आहे. एकदा नाहीतर दोन वेळा एवढ्या कुरापती करूनही अपेक्षित असा परिणाम मिळत नसल्याने हा सर्व्हे बघून काहींची झोप मात्र नक्कीच उडाली असणार.

रोहित पवार पुढं म्हणाले की, जनतेचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या विचारांचा मूड आणि भूमिका मात्र “क्रिस्टल क्लिअर” आहे. सत्ता आणि पैसा कधीही जनतेसमोर आणि विचारधारेसमोर टिकाव धरू शकत नाही, हेच या सर्व्हेतून अधोरेखित झालं. येणाऱ्या निवडणुकांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही रोहित पवार यांनी केला.

सकाळ सर्व्हेनुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के मतदरांनी भाजपला पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसला १९.१ टक्के, राष्ट्रवादी शरद पवार १४.९ टक्के, राष्ट्रवादी अजित पवार ५.७ टक्के, एकनाथ शिंदे ४.९ टक्के, उद्धव ठाकरे १२.७ टक्के, मनसे २.८ टक्के, शेकाप ०.४ टक्के, वंचित २.८ टक्के, एआयएमआयएम ०.४ टक्के, स्वाभिमानी शेतकरी संघटना ०.३ टक्के, प्रहार ०.३ टक्के, बविआ ०.६ टक्के, केसीआर ०.८ टक्के, आप ०.७ टक्के, अपक्ष १ टक्का, इतर ५.५ टक्के पसंती आहे. तर सर्व्हेनुसार, केसीआर यांच्या पक्षाला अवघी ०.८ टक्के पसंती मिळाली आहे.

अर्थात सकाळ सर्व्हे महाविकास आघाडी कायम राहिल्यास त्यांच्यासाठी पोषक असल्याचं दिसून येत आहे. मात्र निवडणुकीला एक वर्ष बाकी असून पुढील वर्षभरात जनतेचा मूड बदलेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT