Aaditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray: नवं नाव-चिन्ह मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब हे नाव..

महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पोटनिवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नावं दिली आहेत. ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' अशी नावं दिली आहेत. यामध्ये ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं आहे मात्र शिंदे गटाला अद्याप चिन्ह मिळालेली नाहीत. त्यावर दोन्हा गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या निर्णयावर बोलताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावर आदित्या ठाकरे म्हणाले "मिळालेलं नाव आम्ही घरोघरी जनतेत घेवून जावू, मिळालेल्या नावात संपूर्ण शिवसेना परिवार आहे. आधी जस घरोघरी जावून काम करत होतो, तसच काम आता पण करणार आहोत. आयोगाने दिलेलं चिन्ह आम्ही देशभर घेवून जावू. आणि या पोटनिवडणूकीत (Andheri Bypoll Election) मोठ्या मताने आमचा विजय होणार आहे. आणि शिंदे गटाला मिळाल्या नावावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले बाळासाहेब हे नाव खऱ्या शिवसेनेला मिळाले आहे.

किती काही झालं तरी ही महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. कारण जे काम केलं आहे ते लोकांसमोर आहे, आणि आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत. पुढे म्हणाले राज्यात घटनाबाह्य सरकार स्थापन झालं आहे. तरी देखील ते वेगवेगळी राजकीय कामे करत आहेत त्यामध्ये फक्त कोणता पक्ष कुठे आहे यावर त्यांच लक्ष आहे." असं मत आदित्या ठाकरे यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT