shivsena esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: "पहिल्याच प्रयत्नात उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकले"

शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल चिन्ह दिलं

सकाळ डिजिटल टीम

Shivsena symbol: शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल चिन्ह दिलं आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. एकीकडे एकनाथ शिंदे गटाची दोन चिन्हे फेटाळण्यात आली असताना येत्या काळात त्यांना नव्यानं चिन्ह देण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशातच आयोगानं पक्षासाठी वेगळं नाव आणि चिन्हाचे वाटप केले आहे. ज्या आदेशाची शिवसैनिक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते तो आदेश आयोगानं दिला आहे.

ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळाले आहे. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव म्हणाले की "पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. कारण 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' या नावाची आम्ही मागणी केले होती तेच नाव आम्हाला मिळाले आहे.

तर आम्ही ज्या चिन्हांची मागणी केली होती त्यापैकीच चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पहिल्याच प्रयत्नात जिंकले आहेत. या निर्णयावर आम्ही आनंदी आहोत, समाधानी आहोत, तर बाळासाहेब ठाकरे हे नाव चोरण्याचे काही लोकांनी प्रयत्न केला परंतु ते झाले नाही. आशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात 'मे' चा हप्ता जमा, पण 'या' दीड लाख महिला राहणार वंचित; नेमकं काय घडलं?

Pune Shirdi Express: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-शिर्डी दररोज धावणार नवी एक्स्प्रेस; रेल्वे दौंड, अहिल्यानगर, राहुरीमार्गे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! महिन्याभरात सोनं 17 हजारांनी स्वस्त; खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे ताजे दर

स्मृती मंधानाने इतिहास रचला; पुरुष खेळाडूंनाही न जमलेला अभूतपूर्व विक्रम नावावर केला... बाबर आझम इथेही भारतीयांच्या मागेच राहिला...

'अग्गंबाई सासूबाई'च्या सेटवर नेहमी त्या...; तेजश्री प्रधानने सांगितली निवेदिता सराफ यांची सवय, म्हणाली, 'त्यांच्यापुढे तुम्ही एखाद्या...'

SCROLL FOR NEXT