Gofan sakal esakal
महाराष्ट्र बातम्या

गोफण | बंद दाराआडची गुपितं

संतोष कानडे

काकांशी फारकत घेतल्यापासून दादाराव दणगटे अस्वस्थ होते. त्यांचं मन स्थिर नव्हतं, रात्रीचा डोळ्याला डोळा लागत नव्हता की सुखाने चार घास घशाखाली उतरत नव्हते.. रात्री-अपरात्री झोपेत असतांना ते मध्येच दचकून उठत. मनात कसलीतरी भीती बसलेली होती. आज दुपारीच त्यांचं मन चलबिचल झालेलं. बंगल्यात इकडून-तिकडे येरझाऱ्या मारीत अन् मध्येच एका खोलीचा दरवाजा उघडून कसलीतरी आकडेमोड करुन बाहेर येत.

असंच आकडेमोड करत असतांना दारावरची बेल वाजली. दादारावांनी लगबगीनं दार उघडलं. दारात त्यांचे दोन मित्र उभे होते. एक नवीन आणि दुसरे जुने. दोघांनाही दादांनी एकदम मध्ये खेचलं आणि दार आतून घट्ट लावून घेतलं. एका अडगळीच्या खोलीत दादाराव त्यांना घेऊन गेले. म्हणाले, ''बोला पटापट.. काय करायचं आता''

दादारावांची ही अवस्था आणि भेदरलेलं रुप बघून त्यांचे जुने मित्र देवाभाऊ फडफडे आणि नाथबापू एकशिंगे बुचकाळ्यात पडले होते. न राहावून देवाभाऊ बोललेच, ''काय झालं दादाराव? एवढे का मनून घाबरले तुमी?'' तेवढ्यात त्यांचे नवीन मित्र नाथबापू दाढी कुरवाळत बोलले, ''नसंल जमत तर तसं सांगा..''

दादाराव खेकसले, ''नसंल जमत? कसं नाही जमणार.. सगळं झालंय आता. शपथा घेऊन झाल्यात. लोकं विश्वासाने सोबत आलेत, पुढचं बघा जरा...''

''किती जमा केले'' नाथबापुंनी खोचक प्रश्नाला हात घातला. तसे देवाभाऊही चमकले आणि तेही म्हणाले ''कितीयत नेमके?''

हे विचारताच दादाराव दणगटे लगबगीने उठले, खोलीचा दरवाजा उघडला आणि त्या दुसऱ्या खोलीत गेले. पुन्हा कसलीतरी आकडेमोड केली आणि माघारी परतले.

''पस्तीस ते चाळीस'' आकडा सांगितला. ''किती? किती?'' नाथबापू चिडवण्याच्या मूडमध्येच होते.

दादा ओरडलेच, ''सांगितलं ना एकदा पस्तीस ते चाळीस. पुन्हा-पु्न्हा तेच काय लावलंय. आता काय ते वाटाघाट्या करा नाहीतर डाव फिस्कटंल बघा''

''ते ठिकंय. पण तुमी त्या दुसऱ्या खोलीत कशाला गेलेले...'' नाथबापुंच्या चेहऱ्यावर निराळीच उत्सुकता होती.

दादाराव खेकसणार तेवढ्यात देवाभाऊच बोलले, ''त्या खोलीतच सगळा मालंय नाथबापू.. रिस्कच नको. दादांचे ते पस्तीस ते चाळीस सवंगडी तिथेच तर आहेत. कोंडून ठेवलंय दादांनी त्यांना...''

''हाहाS हाहाहाSS हाSSS कोंडून! त्याची काय गरज? माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे, असं करु नये...आता त्यांना फिरायला घेऊन जा बरे... झाडी, डोंगर, हाटेल..तिकडे-''

दादाराव म्हणजे मातीतला गडी. नाथबापुंचा हा शहरी मिजास बघून त्यांची सटकली. ''ते तुमचं झाडी-डोंगर आमाला नका शिकवू. त्यानेच तुमचा बाजार उठायची वेळ आलीय. त्यामुळे आता एकदम ओक्के करायचं ठरलंय आमचं''

हे ऐकताच नाथबापू सीरिअस झाले, ''हे बघा दादाराव. सगळं ओक्केच होतं.. तुम्ही बोके घेऊन यायची गरज नव्हती. आमची जुनीच मैत्री होती पंचवीस वर्षांची.. तुमची भाकरी फिरली नाही म्हणून आमच्या भाकरीत वाटेकरी व्हायला निघालात-''

वाद पेटणार हे बघून देवाभाऊ फडफडे दोघांना थांबवत म्हणाले, ''हे बघा. आपल्याला पुढं जायचंय. या देशाला आता नमो विचारांची गरज आहे. ज्यांना हे विचार पटणार नाहीत त्यांचे हाल होणार. त्यामुळे जेवढं मिळतंय, जसं मिळतंय ते घ्यावंच लागेल. नाहीतर... परिस्थिती अवघड होईल.''

नाथबापू एकशिंगे वैतागून बोलले, ''पण आमचं काय चुकलं ते सांगा ना देवाभाऊ? पंचवीस-तीस वर्षांच्या प्रेमाला तुम्ही मूठमाती देणार का? माझी माणसं जीवावर बेतून तुमच्यासोबत आली अन् तुम्ही आज असं वागताय. तुम्ही आजच काय ते स्पष्ट करा. दिल्लीला बोला नाहीतर काहीही करा, पण आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे-''

''थांबा जरा'' दादाराव दणगटे मध्येच बोलले. ''तुम्ही दोघंही आता शांत राहिलात तर बरं होईल. एकदा वाटाघाट्या होऊ द्या. मग पुढचं पुढं बघूच. कुणावर न्याय आणि कुणावर अन्याय, हे तुमच्या दोघांनाही कळेल. दिल्लीश्वरांनी आपल्याला मोठा शब्द दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या दोघांचंही मध्ये बोलण्याचं काम नाही. फक्त मागच्या वेळीसारखा 'अपघात' होऊ नये म्हणून मी जरा सावध झालोय. माणसं कोंडली म्हणजे घाबरलो नाही''

हे ऐकल्यानंतर बंद दाराआडच्या वाटाघाट्या सुरु झाल्या... नाथबापू एकशिंगे दाढी खाजवून त्रस्त झाले होते तर देवाभाऊ फडफडेंना भविष्याची चिंता लागून राहिली होती. दादाराव दणगटे मात्र जाम खूश होते. त्यांचे कोंडलेले सवंगडीही मध्येच आरडाओरड करीत न्याय मागत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Gautam Gambhir: 'लोकांनी आमच्या क्षेत्रात नाक खुपसू नये, आम्ही...', वनडे मालिका जिंकल्यानंतर IPL मालकावर भडकला गंभीर

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT