Maharashtra Political News | Devendra Fadnavis News sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: फडणवीसांनी राज्यपालांना दिलं बहुमत चाचणीचं पत्र

यामध्ये महाविकास आघाडीला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे. त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे पत्र खोट असल्याचं सांगितलं. (Maharashtra Political News Updates)

काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या बहुमताच्या चाचणीसाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्यावर राज्यपाल आता निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. सरकारला लवकरच आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

यासंदर्भात बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या सरकार अल्पमतात चालू आहे म्हणून आम्ही राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे." असं ते म्हणाले.

दरम्यान राज्याच्या सत्तासंघर्षाच तब्बल ९ दिवसांनी भाजपने एंट्री केली असून राज्यपालाची भेट घेत भाजपने मविआ सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. दरम्यान बंड केलेल्या आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने १२ जुलै पर्यंत लांबवली आहे. त्यानंतर राज्यपालांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

फडणवीसांच्या या पत्रानंतर शिंदे गटाने तातडीने गुवाहटीमध्ये एक बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्यानंतर आता शिंदे गटाच्या गोटातून काय निर्णय येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT