Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला सुरुवात; 34 याचिकांचं सहा गटांमध्ये वर्गीकरण

Maharashtra Politics: आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला सुरुवात; 34 याचिकांचं सहा गटांमध्ये वर्गीकरण

संतोष कानडे

मुंबईः शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. तब्बल ३४ याचिकांचं सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं असून प्रमुख याचिकांवर सुनावणी सुरु आहे.

सुनावणीसाठी शिंदे गटाचे वकील अनिल सिंग साखरे तर ठाकरे गटाचे वकील सरोदे हे विधानभवनात दाखल झाले आहेत. मागच्या सुनावणीला आम्हाला काही दिवस वाढवून पाहिजेत, आम्हाला पुरावे सादर करायचे आहेत, अशी शिंदे गटाने मागणी केली होती. या मागणी मात्र ठाकरे गटाने विरोध केला होता.

ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी सुनावणीला उपस्थित असून शिंदे गटाकडून उशिरापर्यंत कुणीही उपस्थित राहिलेलं नव्हतं. सुरुवातीला दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला मर्यादित वेळेत सुनावणी पूर्ण करायची आहे, असं अध्यक्षांनी नमूद केलं.

ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी. सर्वोच्च न्यायालयात जे पुरावे दिले, ते पुरेसे असताना वेगळ्या पुराव्यांची गरज नाही. त्यावर अध्यक्षांनी दोन्ही बाजूंचे पुरावे तपासणार असल्याचं म्हटलं आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून आम्हाला मेलवर व्हिप मिळाला नसल्याचा दावा करण्यात आलाय. तर ठाकरे गटाच्या वकिलांनी तसे पुरावे असल्याचं नमूद केलंय. यावरुनच दोन्ही गटांमध्ये घमासान सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT