Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: 'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी'; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

जयंत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ डिजिटल टीम

पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. (maharashtra politics Jayant Patil Sharad Pawar Ajit Pawar Devendra Fadnavis early morning swearing )

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. त्यांच्या शपथविधीला ३ वर्ष पुर्ण झाले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

Prakash Ambedkar : "शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल"

यासंदर्भात जयंत पाटील यांनी नुकतचं भाष्य केलं आहे. 'राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याअनुशंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.

राष्ट्रवादीचा ठाकरेंना अल्टिमेटम

शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला आहे.

'उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीबाबतचा महाविकासआघाडीसंदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा. आपण लवकर बसून ठरवू. उद्धव ठाकरे जेवढ्या लवकर निर्णय जाहीर करतील तेवढं चांगलं होईल. असही जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT