Eknath Shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai : आव्हाड, शिरसाट CM शिंदेंच्या भेटीला; वादळी भेटीत काय शिजणार?

ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

निनाद कुलकर्णी

Jitendra Awhad News : सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून, अनेकांनी शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर, अनेक राजकीय नेते एकनाथ शिंदेंची वेळोवेळी भेट घेत असून, आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड स्वतः एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आव्हाडांसोबत शिंदे गटातील संजय शिरसाट हे देखील शिंदेंची भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यात शिरसाटांना अनेक दिवसांपासून विविध पदांसाठी सातत्याने डावललं जात आहे. त्यात तेदेखील शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे नेमकं शिरसाटांच्या मनात काय चालू आहे? हे काही केल्या समोर आलेले नाही.

सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी मविआ काळात घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. त्यात आता आव्हाड स्वतः शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान नेमकी कोणत्या विषयांवरून चर्चा होते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

शिंदे गटातील मंत्री खात्यांबाबत असमाधानी

तर, दुसरीकडे आव्हाडांसोबत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे देखील शिंदेंच्या भेटीला गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरसाटांना विविध पदांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, आपण नाराज नसल्याचे शिंदे जी जबाबदारी देतील ती संभाळू असे शिरसाटांनी याआधी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील काही मंत्री हे खात्याबाबत असमाधानी असल्याचेही सांगितले जात आहे.

ग्रामीण भागाशी संबंधित खातं मिळावं, यासाठी शिंदे गटातील काही जण आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामविकास, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे गटातील काही मंत्री इच्छुकअसून, या खात्यांसाठी काही मंत्री नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. तर ग्रामविकास आणि जलसंपदा ही खाती अनुक्रमे गिरीष महाजन आणि देवेंद्र फडणवीसांकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT