Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी बडा नेता मुंबई दौऱ्यावर? भाजपच्या हालचालींना वेग

कर्नाटकातील हातची सत्ता गमावल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली

धनश्री ओतारी

कर्नाटकचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. कर्नाटकातील हातची सत्ता गमावल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार भाजपनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी बडा नेता मुंबई दौऱ्यावर येणार आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने कंबर कसली आहे. अशातच भाजपने आता आपला मोर्चा तरुणांकडे वळवला आहे.

राज्यात आधीच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावतीने युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असताना आता मुंबईतील युवकांना भाजप साद घालणार आहे. यासाठी येत्या 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअर बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

येत्या निवडणुकीत भाजप नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने सुरुवात केली आहे. साठी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार आदींशी संपर्क सांधण्यास सांगितले आहे. भाजपचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे.

त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT