Maharashtra Politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राज्यात भाजपला मोठा धक्का; 5 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा विजय!

सकाळ डिजिटल टीम

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर याठिकाणी महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले. हा भाजपसाठी पर्यायी महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नांदेडमध्ये नुकतीच सहा बाजार समितीची निवडणुक झाली. याचे निकाल हाती आले आहेत. या ठिकणी ६ पैकी ५ समित्यांवर महाविकास आघाडीने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.

मात्र मुखेड बाजार समिती मध्ये भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केला. या ठिकाणी भाजपने 18 पैकी 12 जागा जिंकल्या. तर दुसरीकडे उमरी बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या

बीलोलीत बाजार समितीमध्ये 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. कोंडलवाडी बाजार समितीमध्ये 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या . माहुर बाजार समितीमध्ये 18 पैकी 14 महाविकास आघाडीने जिंकल्या.

धक्कादायक निकाल म्हणजे लोहा बाजार समितीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा पराभव झाला. महाविकास आघाडीला या ठिकाणी 18 पैकी 16 जागा मिळाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT