Uddhav Thackeray Sharad Pawar Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची चाल बिघडली? उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या वक्तव्यामुळे मविआत धुसफूस असल्याची चर्चा आहे.

वैष्णवी कारंजकर

महाविकास आघाडी आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतले तीनही पक्ष आपण एकत्र असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण शरद पवारांची गेल्या काही दिवसांतली विधानं पाहता हे तिन्ही पक्ष एकमेकांपासून कुठेतरी दुरावत असल्याची चिन्हं आहेत. यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचीही चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या सभेमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांची अनुपस्थिती याच तणावाचे संकेत देत आहे. तसंच या सभेत उद्धव ठाकरेंचं झालेलं जोरदार स्वागत, आतषबाजी यामुळेही इतर पक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.

या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार हे तर नक्की आहे. आता या चर्चेचा विषय काय असेल? या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं घडणार आहे का? हे प्रश्न गुलदस्त्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खासदारकीसाठी TMC बंडखोरांनी निवडला त्रिपुरातला लहान पक्ष, फक्त नावाला अस्तित्वात; दोन वर्षांपूर्वी NCPIची स्थापना

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Pune Ring Road: पुणे परिसरातील ११७ गावांसाठी मोठी बातमी! सरकारच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा, रिंगरोडलाही मिळणार वेग

Nagpur: मांजर चावल्यानं तक्रारीला उशीर, विनयभंगाचा गुन्हा कोर्टानं केला रद्द; शाळेच्या अध्यक्षाला दिलासा

Ratnagiri Rain Update : कोकण किनारपट्टीवर कडकडीत ऊन! मुंबई वेधशाळेचा पुढील 3 दिवसांचा 'हा' अंदाज वाचून शेतकऱ्यांची धडधड वाढली, 2 हजार हेक्टरवरील पेरण्या संकटात

SCROLL FOR NEXT