Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राज्यात NCP विरुद्ध NCP, सेना विरुद्ध सेना; भाजपला कशी होणार मदत?

Maharashtra Politics: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या तर एनडीएचा भाग असलेल्या शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपला आहे. तर काँग्रेसला केवळ १ आणि राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची साथ आवश्यक आहे.

Sandip Kapde

Maharashtra Politics

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धारित केलेले टार्गेट ४०० पूर्ण करायचे असेल तर  भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी लोकसभेच्या ४८ जागा असलेले महाराष्ट्र हे प्रमुख राज्यांपैकी एक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या तर एनडीएचा भाग असलेल्या शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपला आहे. तर काँग्रेसला केवळ १ आणि राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या होत्या.  त्यामुळे भाजपला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची साथ आवश्यक आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल ज्यात राजकीय विभाजनाच्या विरुद्ध बाजूंनी एकाच पक्षाचे दोन लढाऊ गट दिसतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन प्रादेशिक दिग्गजांचे पक्ष फुटले आहेत. आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. शिवसेना फुटल्यानंतर बंडखोर गटाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांना भाजपने चतुरस्त्र राजकीय खेळी रचली . बंडखोर सेनेच्या गटाला खिंडार पाडण्यात मोलाची भूमिका बजावणारे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्वाच्या दबावाखाली उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.

त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला अखेरीस निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली.काही महिन्यांनंतर, शरद पवारांना अशाच बंडाचा सामना करावा लागला.  राष्ट्रवादील बंडखोर गटाचे नेतृत्व त्यांचे पुतणे अजित पवार यांनी केले. महाराष्ट्रातील दिग्गज राजकारण्याला चकित करणाऱ्या अजित पवारांनी बहुतांश आमदारांसह पक्षातून बाहेर पडले. ते एनडीए आघाडीतही सामील झाले आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक समानाता आहे की दोन्ही बंडखोर गटाला निवडणूक आयोगाने मुळ पक्ष म्हणून मान्याता दिली आहे. निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला मान्यता दिल्याने आता त्यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, NCP आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केल्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला (MVA) दुहेरी फटका बसल्याने राज्यात विरोधी आघाडीची ताकद खूपच कमकुवत झाल्याची तर्चा आहे.

महाराष्ट्र देशाची दिशा ठरवेल आणि "दिल्लीत भगवे वादळ येऊन हुकूमशाहीला उखडून टाकेल" असा दावा ठाकरे गटषप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  केला. सत्य हेच आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही आपापल्या पक्षांच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत आहेत, तर त्यांच्या फुटलेल्या गटांचे नेते सत्तेत आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्हाशिवाय ही दोन प्रादेशिक दिग्गजांसाठी एक कठीण परीक्षा असेल, ज्यांनी एकेकाळी राज्याच्या राजकारणात नेतृत्व केले होते. दरम्यान शिंदे गट आणि अजित पवार गट दोघांचा थेट फायदा भाजपला होणार आहे. महाराष्ट्रात भाजपपेक्षा प्रादेशिक पक्षाची ताकद जास्त आहे.

राज्यांमधील या मोठ्या उलथापालथींचा लोकसभा निवडणुकीत एनडीएला कितपत फायदा होतो, हा नंतरचा विषय आहे, पण आता राज्यसभा निवडणुकीत त्याचा फायदा युतीला होताना दिसत आहे. बिहार आणि महाराष्ट्राच्या बदललेल्या समीकरणामुळे एनडीएसाठी सहा जादा जागा निर्माण झाल्या आहेत. वास्तविक, निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 56 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

ज्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्यापैकी १० उत्तर प्रदेशातील, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी पाच, कर्नाटक आणि गुजरातमधील प्रत्येकी चार आणि ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थानमधील आहेत. प्रत्येकी तीन जागा आहेत. उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठीही निवडणुका होणार आहेत. अजित सरकारमध्ये सामील झाल्यामुळे महाराष्ट्रात दोन जागांचा फायदा होताना दिसत आहे. महाराष्ट्रात रिक्त झालेल्या सहा जागांपैकी भाजपकडे तीन आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Maharashtra Latest News Update: पोलिस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त मुख्याध्यापकास लुटले

SCROLL FOR NEXT