Vinod-Tawde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राज्यातल्या घडामोडींच्या मागे विनोद तावडे? स्वतः ट्वीट करत हात काढून घेतला

महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूत झाली आहे, असंही तावडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या घडामोडींमागे भाजपाचं ऑपरेशन लोटस आणि त्यासाठी काम करणारे विनोद तावडेंचा हात असल्याचं बोललं जात आहे. त्याबद्दल त्यांनीच आता स्पष्टीकरण दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या ऑपरेशन लोटसबद्दलचा अहवाल विनोद तावडे यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे दिल्याचं बोललं जात आहे. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. याबद्दल आता विनोद तावडे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये विनोद तावडे म्हणाले, "दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे."

भाजपाने राज्यात ऑपरेशन लोटस सुरू केलं असल्याचं सांगितलं जात आहे. २०२४ च्या निवडणुकीतलं नुकसान टाळण्यासाठी हे सुरू केलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याच्या चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT