sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

जनताच करेल सत्ता बरखास्त - शरद पवार

शरद पवार : राज्य सरकारे बरखास्तीचे षडयंत्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘सत्ता केंद्रित करणे हे पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न असू शकतो. परंतु अशा सत्तेविरोधात जनता बोलत नाही, ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्यातील सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता बरखास्त केल्याशिवाय जनता राहणार नाही,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी पार पडली. विरोधातील अडीच वर्ष लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

‘‘आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हलला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाद दुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. महाराष्ट्रात नुकतेच जे सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत त्यामुळे एक वेगळे चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल,’’ असेही शरद पवार म्हणाले.

यश मिळवायचे आहे - अजित पवार

‘‘आपल्याला यश मिळवायचे आहे. आता सरकार नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. याविरोधात आपल्या महिला आंदोलन करत आहेत. तशाच पद्धतीने त्या - त्या भागातही आंदोलन करायला हवे. राज्यात कुठल्याही निवडणुका जाहीर झाल्या की आपण तयार असले पाहिजे.भाजपचा पराभव करायचा असेल तिथे एकत्र आले पाहिजे, असे अावाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT