Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राहुल नार्वेकरांचा असंवैधानिक सरकारला पाठिंबा; राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा आरोप

Sandip Kapde

Maharashtra Politics:  शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे काल (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना फटकारले. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आतापर्यंत काय केले ते दोन आठवड्यांत सांगावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल आणि न्यायालयाचा सन्मान पाळावा लागेल.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास विलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान कोर्टाच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप राऊत यांनी केला. राहुल नार्वेकर हे असंवैधानिक सरकारला पाठिंबा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, राजकीय पक्षाचे काही आमदार दुसऱ्या पक्षात जाणे म्हणजे विभाजन होत नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट निर्देशानंतर देखील विधानसभा अध्यक्ष अपात्र याचिकांवर निर्णय घेण्यास वेळखाऊपणा करत आहेत. तसेच ते राज्यातील असंवैधानिक सरकारला पाठिंबा देत आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर या समस्यांचा सांगणार असून आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्र   विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या दिरंगाईवर आता प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. कारण शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांनी केलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्वरीत कारवाई करावी आणि लवकरात लवकर निकाल द्यावा.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मुंबईत खळबळजनक प्रकार! मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांचे 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडीओ, 49 वर्षीय व्यक्तीला अटक

IND U19 vs PAK U19: कोण आहे अर्जुन राजपूत? पाकिस्तानी गोलंदाजांना एकटा नडला अन् ठोकलं झुंजार शतक; Video

Diwali 2026: नरक चतुर्दशीला कारिट फोडण्याची काय आहे प्रथा? जाणून घ्या या परंपरेमागचा अर्थ

Latest Marathi News Live Update: श्रीनगरमध्ये सक्रिय असलेल्या चार वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो जारी

“सिनेमातून काढलं, धमक्यांचे फोन आले...” विवेक ओबेरॉयच्या करिअरमध्ये असं काय घडलं की निर्मातेही घाबरू लागले?

SCROLL FOR NEXT