sanjay raut raj thackeray uddhav thackeray balasaheb thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena: कितीही वादळ येऊदे संजय राऊत अजूनही राज ठाकरेंच्या जवळचे?

राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र कुणी लिहिलं?

धनश्री ओतारी

संजय राऊत अजूनही राज ठाकरेंच्या जवळचे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात सध्या उपस्थित होत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये काही गोष्टींचा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Politics Sanjay Raut close still to Raj Thackeray )

महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनापासून नाराज असलेल्या राज ठाकरे यांनी वेगळी वाट निवडली. शिवसेनेतून पहिल्यांदा एक 'ठाकरे' बाहेर पडले होते. राज ठाकरे यांनी भावूक भाषण दिलं आणि शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. राज ठाकरे यांच्या राजीनाम्याचं पत्र संजय राऊतांनी लिहिलं, अशी चर्चा आजही राजकीय वर्तुळात सुरु असते.

दरम्यान, या सर्वावर राऊत यांनी भाष्य करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे अजूनही जवळचे असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्या राजीनाम्याचं पत्र तुम्हीच लिहिलं होतं, असा तुमच्यावर आरोप आहे, असा सवाल अवधूत गुप्ते यांनी केला. त्यावर उत्तर देताना, 'राज ठाकरे आणि माझी मैत्री ही जगजाहीर होती. त्या काळात आम्ही चांगले मित्र होतो.

आम्ही एकमेकांकडे अनेक भावना व्यक्त देखील करायचो. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय? याची मला कल्पना होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. पण ही कुटुंबात पडलेली फूट आहे.''

मी पक्षाचा किंवा उद्धव ठाकरेंचा मालक नाही. मी राज ठाकरे यांच्या फार जवळचा होतो, असा आरोप केला जात होता. मी अनेकांच्या जवळ आहे. त्यांच्याबरोबरची नाती मी टिकवून ठेवलीयेत हे अनेकांना खुपतं, असं म्हणत त्यांनी वर्षानुवर्ष रुतलेला काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT