MLA Nitin Deshmukh  esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Deshmukh: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार

रुपेश नामदास

नागपुरात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नितीन देशमुख कार्यकर्त्यांसह रवी भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. यानंतर आमदार आणि त्यांच्या समर्थकांची पोलिसांशी बाचाबाची झाली. नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार नागपूर पोलिसांनी या प्रकरणी आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआर नुसार, मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आमदार नितीन देशमुख त्यांच्या काही सहकाऱ्यांसह कारमध्ये रवी भवनमध्ये पोहोचले आणि इमारतीत जात होते.

देशमुख यांना त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशासाठी प्रवेश पास घेण्यास सांगण्यात आले, मात्र, सुरुवातीला त्यांच्या समर्थकांसाठी प्रवेश पास घेण्याचे मान्य केल्यानंतर त्यांनी नंतर नकार दिला. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. त्यामध्ये देशमुख यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT