CM Eknath Shinde News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena News: CM एकनाथ शिंदे आता 'या' तीन पदावर राज करणार का? चर्चेला उधाण

शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये

सकाळ डिजिटल टीम

CM Eknath Shinde News: शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय. शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं कोणतं पद स्विकारणार असा सवाल उपस्थित होत आहे.(Maharashtra Politics Shiv Sena Cm Eknath Shinde post chief leader)

केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, शिवेसना पक्षाची पहिली कार्यकारणी ठरवण्या संदर्भातची बैठक होणार आहे. ही बैठक संध्याकाळी ७ वाजता दक्षिण मुंबईतील ताज प्रेसिडेंसी या हॅाटेलमध्ये होणार आहे.

या बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर बैठकीतून निर्णय जाहीर करण्यासाठी, शिवसेना पक्षाची पत्रकार परीषद ही होणार आहे.

निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे “मुख्य नेते” असे पद देण्यात आले होते. त्या ऐवजी आता पक्षाला अधिकृत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तीन सर्वोच्च पदाचा विचार कार्यकारिणी करत असल्याची माहिती समोर आलीय.

शिवसेना पक्ष प्रमुख, शिवेसना अध्यक्ष, शिवेसना मुख्य नेता अशी ही तीन पदं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या पैकी एक पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्या संदर्भात, कार्यकारणी बैठकीत महत्वाचा निर्णय होणार आहे.

वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा “मुख्य नेते” पदावर सर्वानुमते निवड करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे संसदीय नेते म्हणून जेष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचीही माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

Pune Crime : अंमली पदार्थ विक्रीतील रेकॉर्डवरील आरोपी शेरखान पठाण दोन वर्षांसाठी पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी-चिंचवड हद्दीतून तडीपार

Education Success: श्री मुक्तादेवी विद्यालयाच्या साक्षी उंडे व अनुष्का भारमळ यांचा एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकदार यश

Pune School Award: जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव, पुणे जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मोहिमेत मानाचा बहुमान

SCROLL FOR NEXT