Maharashtra Politics shiv sena rebel mla leader challenge to ncp solapur  esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना आमदारांचे बंडातून राष्ट्रवादीला ‘आव्हान’

निधीवरून कोंडीत पकडल्यानंतर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भाजपसोबत सत्ता स्थापन करता आली नसल्याने शिवसेनेने परंपरागत विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला. पण, अडीच वर्षांत शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्याच पालकमंत्र्यांना व आमदारांना सर्वाधिक निधी मिळाला. त्यातून राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांसमोर आव्हान उभे केले. त्यातूनच शिवसेना आमदारांनी बंड पुकारत राष्ट्रवादीला प्रतिआव्हान दिले आहे. आगामी निवडणुकीत विजयाची शाश्वती नसल्याने एकनाथ शिंदेंच्या बरोबर जाऊन तब्बल ४२ आमदारांनी बंडखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ होते. पण, सध्या ५५ आमदारांपैकी तब्बल ४१ आमदारांनी पक्षाविरूद्ध बंडखोरी केली आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले ‘प्रहार’ जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू हेदेखील बंडखोरीत सामील झाले आहेत. सुरवातीला पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून सर्वच आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पण, अडीच वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना भरघोस निधी मिळवून दिला. त्याचवेळी आम्हाला निधीसाठी संघर्ष करावा लागला, असा शिवसेना आमदारांचा आरोप आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपसोबत युती करून लढलेल्या बहुतेक उमेदवारांना विजय मिळाला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता. आता तेच उमेदवार शिवसेनेचा आमदार असलेल्या मतदारसंघात स्वत:चा जम बसवून आगामी निवडणुकीत आमदारकीचे स्वप्न पाहू लागले आहेत. हा डाव ओळखून त्या आमदारांनी बंडखोरीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. ‘ईडी’च्या कारवाईची पण भीती काहींना आहे, पण खरे कारण आता समोर आले आहे.

भाजपसोबत जाऊ, अन्यथा सत्ता नकोच

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पक्षाला अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपसोबतच युती करावी लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनेकदा भाजपसोबत पटले नाही. तरीपण त्यांनी युती तोडली नाही किंवा त्यांच्यापासून दूर जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केली नाही, याची आठवणही त्या आमदारांनी करून दिली. त्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडा, अशी मागणी त्या बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT