Uday Samant  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : "...जी पातळी गाठतोय ते योग्य नाही"; उदय सामंतांनी टोचले 'काही' नेत्यांचे कान

विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद शिगेला पोहोचले आहेत. अशातच उदय सामंत यांनी ही विनंती केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातल्या नेत्यांनी टीका करताना पातळी सोडून टीका करू नये, असं सांगत बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी नेत्यांचे कान टोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर विविध पक्ष एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद शिगेला पोहोचले आहेत. अशातच उदय सामंत यांनी ट्वीट करत हे आवाहन केलं आहे.

काय म्हणतात उदय सामंत?

आपल्या ट्वीटमध्ये उदय सामंत म्हणतात, "महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो, राजकारणामध्ये टीका टिपण्णी होत असते. परंतु टीका करताना आपण जी पातळी गाठतोय ती योग्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात टीकाटिप्पण्यांना उत आला आहे. दसरा मेळाव्यापासूनच या सगळ्याला सुरुवात झाली आहे. विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधले नेते सातत्याने एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. भास्कर जाधव आणि राणे बंधू यांच्यातला संघर्ष सध्या ताजा आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचा रोख नक्की कोणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

Navratri Day Six: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Supreme Court: सुनावणी सुरु असताना CJI सूर्यकांत यांच्यासमोरच न्यायालयात राडा! वकिलाचा मायक्रोफोन हिसकावला, चालू प्रकरणातून वकिलाची माघार

SCROLL FOR NEXT